धुमाकूळ घालणारा वाघ जेरबंद

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
नागभिड, 
नागभिड व तळोधी (बा.) परिसरात धुमाकूळ घालणार्‍या Tiger captured वाघास जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले आहे. ब्रह्मपुरी वन विभागांतर्गत येणार्‍या नागभीड तालुक्यातील मिंथुर निवासी हरिदास कुबडे (58), तळोधी वन परिक्षेत्रातील आकापूर, सावर्ला परिसरातील शेतकरी वासुदेव वेटे (40) व सरपन गोळा करण्याकरिता गेलेल्या तळोधी (बा.) येथील महिला प्रेमीला वाटगुरे (45) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.
 
 
wagh
 
सतत घडणार्‍या वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागभिड परिसरातील मिंथुर, मिंडाळा तथा तळोधी परिसरातील आकापूर, सावर्ला, तळोधी येथील शेतकर्‍यांमध्ये दहशत पसरली होती. त्यामुळे वनविभागाने शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाघाला पकडण्याची प्रक्रिया राबवली. टीसीसी रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली शुटर अजय मराठे यांनी वाघाला बेशुध्द करून सुरक्षित पिंजर्‍यात जोरबंद केले.
 
 
Tiger captured  ही मोहीम उप वन संरक्षक डॉ. कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक महेश गायकवाड, बायोलॉजिस्ट राकेश अहुजा, वनपरिक्षेत्र अधिकारी अनुप कन्नमवार यांनी सुरक्षितरित्या राबविली. यावेळी तळोधी वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी, स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, अध्यक्ष यश कायरकर व मागोवा पथकाचे वन मजूर उपस्थित होते.