वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये ‘ऑपरेशन अमानत’

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
प्रवाशाची ३६ हजार रुपयांची इयररिंग शोधली
 
नागपूर, 
Vande Bharat Express: 'Operation Amanat' रेल्वे प्रवासात हरवलेल्या मौल्यवान चीज वस्तू परत मिळण्याची शक्यता तशी कमीच असते. मात्र वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची सोन्याची इयररिंग रेल्वे सुरक्षा तत्पर प्रतिसाद देत हरवलेली सोन्याची बाली शोधून काढली. तसेच तक्रारदार मनोज जेठानंद मनुजा यांच्याकडील आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना बाली परत देण्यात आली. या संपूर्ण कारवाईबद्दल संबंधित प्रवाशाने आरपीएफच्या कार्याचे कौतुक करत आभार मानले.
 
 
Vande Bharat
 
Vande Bharat Express: 'Operation Amanat'  दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत कार्यरत रेल्वे सुरक्षा दलाने वंदे भारत एक्स्प्रेसमधील एका महिलेची सोन्याची शोधून काढली. ही घटना ट्रेन नंबर २०८२६ वंदे भारत एक्स्प्रेस मधील कोच नंबर ई मध्ये ८ एप्रिलला घडली. ही इयररिंग ३६ हजार रुपयांची होती. प्रवास करणार्‍या या महिलेने सोन्याची इयररिंग (बाली) हरवल्याची तक्रार रेलमदद पोर्टलवर नोंदवण्यात आल्यानंतर आरपीएफच्या पथकाने ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत शोधमोहीम सुरू केली होती. सुरक्षा पथकातील आरक्षक पी. सिंह यांनी तत्परतेने ई-१ डब्यात तपासणी करत हरवलेली सोन्याची बाली शोधून काढली. प्रवासादरम्यान आपल्या सामानाची विशेष काळजी घ्यावी तसेच कोणतीही अडचण आल्यास किंवा हरवल्यास तत्काळ रेलमदद हेल्पलाइन १३९ किंवा जवळच्या रेल्वे अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचे आवाहन आरपीएफने प्रवाशांना केले आहे.