अचलपुरात १६ एप्रिलपासून विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
अमरावती, 
'Vidarbha Kesari Wrestling Tournament' अचलपुरच्या नगराध्यक्ष रुपाली अभय माथने यांच्या पुढाकाराने विदर्भ कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने श्री हनुमान आखाडा बिलनपुरा अचलपूर, नगरपरिषद अचलपूर व अमरावती शहर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या संयुक्त विद्यमाने अचलपुरच्या विठ्ठलवाडी मैदानावर १६ ते १८ एप्रिल दरम्यान पालकमंत्री चषक व ३८ वी विदर्भ केसरी पुरुष व महिला कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
 
 
kusti
 
स्पर्धेमध्ये विदर्भातील ११ जिल्ह्याचे व ४ महानगरपालिका असे एकूण १५ संघ सहभागी होणार आहे. ३०० पैलवान व २५ पंच, ५० कार्यकर्ते यांचे अचलपूर येथे आगमन होणार आहे. त्यांची आयोजकांकडून राहण्याची व जेवण्याची उत्तम व्यवस्था करण्यात येणार आहे. विदर्भ केसरी बहुमान मिळवणार्‍या प्रथम, द्वितीय व तृतीय पैलवानास रोख रक्कम, चांदीची गदा, पदक, प्रमाणपत्र, होंडा शाईन मोटरसायकल, रोख रक्कम देण्यात येणार आहे.
 
 
'Vidarbha Kesari Wrestling Tournament'  पुरुष प्रौढ वयोगट ५७, ६१, ६५, ७०, ७४ ते १२५ राहणार आहे. कुमार वयोगट- ४८,५१, ५५ राहील. महिला वयोगट ४८, ५३, ५७, ५९, ६३ ते ७६ असा राहील. महिला कुमार वयोगट ४०, ४३, ४६ असा राहणार आहे. तिन्ही गटामध्ये एकूण ३ लाख० रोख रक्कमेचे बक्षिस दिले जाणार आहे. १६ एप्रिलला सर्व पैलवानांचे वजने सकाळी १० ते १ वाजेपर्यत होतील. सायंकाळी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, आमदार प्रवीण तायडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष डॉ. संजय तिरथकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर, करणार आहे. बक्षीस समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तिवस्याचे आमदार राजेश वानखडे यांच्याहस्ते होईल. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, उपाध्यक्ष डॉ. संजय तिरथकर, नगराध्यक्ष रुपाली माथने, अभय माथने, भास्कर टोम्पे, दिलीप इटनकर, प्रशांत अडसड, जितेंद्र भुयार, समीर देशमुख उपस्थित होते.