घरात घुसून महिलेचा विनयभंग

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
पती व सासऱ्यास मारहाण
दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

उमरखेड, 
Woman molestation case शहरातील एका महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग आणि तिच्या पती व सासऱ्यास मारहाण केल्याची गंभीर घटना शुक्रवार, 10 एप्रिल रोजी रात्री 11.30 च्या दरम्यान घडली. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आपल्या पती व सासऱ्यासह घरात झोपलेली असताना अचानक दरवाज्यावर जोरात आवाज झाला. दरवाजा उघडताच आरोपी गजानन अशोक डहाळे (वय 24) व अथर्व विजय माळवे (वय 24, दोन्ही उमरखेड) हे जबरदस्तीने घरात घुसले.
 
 
vinay
 
Woman molestation case  यावेळी आरोपी अथर्व माळवे याने महिलेचा हात धरून तिला जवळ ओढत तिचा विनयभंग केला. महिलेला त्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी तिचे पती व सासरे पुढे आले असता, दोन्ही आरोपींनी त्यांना मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास उमरखेड पोलिस ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात प्रकाश बोंबले करीत आहेत.