इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारीमंडळाच्या स्थानिक सनियंत्रण समितीची आढावा बैठक

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
यवतमाळ, 
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम Workers' Welfare Board कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत गठीत स्थानिक सनियंत्रण समितीमार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण तसेच विविध शासकीय लाभांचे प्रभावी वाटप यासंदर्भात सविस्तर आढावा बैठक शनिवार, 11 एप्रिल रोजी घेण्यात आली. ही बैठक समितीचे अध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या अध्यक्षतेत पार पडली. बैठकीदरम्यान कामगार नोंदणी प्रक्रियेतील अडचणी, नूतनीकरणातील विलंब, तसेच विविध योजनांच्या लाभांचे वितरण अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. कामगारांना वेळेत आणि योग्य लाभ मिळावेत, यासाठी यंत्रणेमध्ये अधिक समन्वय व गती आवश्यक असल्याचे आमदार मांगुळकर यांनी अधोरेखित केले.
 
 
kamgar
 
Workers' Welfare Board  पात्र कामगारांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती प्रभावीपणे पोचविणे, नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आणि लाभ वितरणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित अधिकाèयांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. कामगारांच्या हितासाठी कार्यपद्धती अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला. या बैठकीस समितीचे सदस्य नंदू कुडमेथे, दिनेश इंगळे, दशरथ कांबळे, झिशान शेख, मनीषा देशमुख, रजनी हिंगासपुरे तसेच संबंधित विभागाचे जिल्हा कामगार अधिकारी राहुल काळे, गुल्हाने, जतकर प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी, कामगार कल्याणाच्या दृष्टीने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी केले.