श्रीनगर
Amarnath Yatra अमरनाथ यात्रेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, यावर्षी यात्रा ३ जुलै ते २८ ऑगस्टपर्यंत चालेल. ५७ दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी जम्मू येथील भगवती नगर बेस कॅम्पमधून पहिला जत्था रवाना होईल. यात्रेसाठी नोंदणी १५ एप्रिलपासून सुरू होईल.
Amarnath Yatra एलजी सिन्हा यांनी यात्रेची माहिती देताना माध्यमांना सांगितले की, १३ ते ७० वयोगटातील लोक ही यात्रा करू शकतात. गुहेत पहिली पूजा १९ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला केली जाईल.
यात्रेसाठी अनंतनाग येथून पारंपरिक ४८ किमी लांबीचा नुनवान-पहलगाम मार्ग आणि गांदरबल येथून १४ किमी लांबीचा बालटाल मार्ग खुला राहील.
५५६ बँक शाखांमधून ऑफलाइन नोंदणी
Amarnath Yatra एलजी सिन्हा यांनी सांगितले की, देशभरातील सुमारे ५५६ निश्चित बँक शाखांमधून यात्रेसाठी नोंदणी करता येईल, तर श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन नोंदणी देखील करता येईल. नोंदणीसाठी येस बँक, आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अॅक्सिस बँकेच्या शाखांमध्ये यात्रेचे नोंदणी अर्ज उपलब्ध असतील.
यंदा काय-काय नवीन?
Amarnath Yatra मनोज सिन्हा यांच्या मते, गेल्या वर्षांच्या तुलनेत व्यवस्थांमध्ये २५ टक्के वाढ करण्यात आली आहे. ट्रॅकिंग आणि सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी RFID कार्डची सुरुवात करण्यात आली आहे. तीर्थयात्रेकरूंसाठी ग्रुप अपघाती विमा कवच दुप्पट करून ५ लाखांवरून १० लाख करण्यात आले आहे. प्रवासादरम्यान वापरल्या जाणाèया टट्टूंचा (पोनीज) मृत्यू झाल्यास ५०,००० ची भरपाई दिली जाईल.