Asha Bhosle आठ दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाèया, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाèया ज्येष्ठ गायिका, सुरांची साम्राज्ञी आशा भोसले यांनी १२ एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अनेक दशकांपासूनची सुरांची साथ संगत थांबली. आपल्या लाडक्या आशाताई आपल्यातून कायमच्या निघून गेल्या. एका युगाचा अस्त झाला आहे.
Asha Bhosle विविध भाषेतून तब्बल १२ हजार गाणी गाणारी सुरांची साम्राज्ञी काळाच्या पडद्याआड गेली. आशाताईंच्या निधनाने बॉलिवूडच नाही तर संपूर्ण संगीत क्षेत्र एका महान गायिकेला मुकला आहे. ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशाताईंनी आपले पिता पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून संगीताचे धडे घेतले.
Asha Bhosle सुरुवातीच्या संघर्षानंतर त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा २० पेक्षा जास्त भाषांमध्ये १२ हजारांहुन अधिक गाणी रेकॉर्ड करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. पिया तू अब तो आजा, दम मारो दम, चुरा लिया हैं तुमने, केव्हातरी पहाटे, सांज ये गोकुळी, मी मज हरपून बसले गं ये मेरा दिल यासारखी गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. जुन्या नायिकांपासून अगदी नव्या जमान्यातील अभिनेत्रींच्या गाण्यांनाही त्यांनी आपला सुरेल आवाज दिला.
Asha Bhosle आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी जोड्यांपैकी एक ठरली. महाराष्ट्र भूषण आशाताईंना त्यांच्या पार्श्वगायनातील योगदानासाठी पद्म विभूषणने सन्मानित करण्यात आले.
Asha Bhosle माईकसमोर आले की दु:खाचा विसर
आशा भोसले यांचा आवाज वगळता, परिस्थितीशी जुळवून घेण्याची अनुकूलता हा नेहमीच त्यांचा सर्वात मोठा प्लस पॉइंट राहिला आहे. जीवन काय देऊ शकतं याची जाणीव असल्याने ती येते, असं त्यांचं मत आहे. त्या सांगायच्या ‘माझी आई म्हणायची की माणूस विहिरीतल्या बेडकासारखा नसावा. जग हे एक विशाल ठिकाण आहे आणि मी स्वतःला नेहमीच त्याची आठवण करून देते.’
Asha Bhosle कुटुंबाला आधार देण्यासाठी गाण्याव्यतिरिक्त मी फार काही करू शकत नव्हते. . ‘मी अभ्यास केलेला नाही, म्हणून मी लेखिका होऊ शकली नाही. मी सुंदर नाही, म्हणून मी अभिनेत्री होऊ शकले नाही. पण मी गाऊ शकते - मी काहीही गाऊ शकते.आणि जेव्हा मी मायक्रोफोनसमोर असते, तेव्हा माझे सर्व दुःख नाहीसे होते. संगीत हा माझा आवडता साथीदार आहे; तो मला कधीही निराश करत नाही. मी सुरुवात केली तेव्हा मी कदाचित खूप भोळी होते आणि हा उद्योग कसा चालतो हे समजणे कठीण होते. पण वाट्याला आलेल्या नकार आणि उपहासामुळे मला पुढे जाण्यास भाग पाडले आणि शेवटी मला यश मिळाले. आशाताईंच्या आवाजात रोमान्स, विरह, खट्याळपणा आणि गझलेची नजाकत एकाच वेळी अनुभवायला मिळायची. त्यांचा आवाज म्हणजे भारतीय संगीतविश्वाचा एक अमर ठेवा आहे.
जगभरातील दहा देशांमध्ये रेस्टॉरेंट
आशाताई केवळ सुरेल गायिकाच नव्हे तर उत्तम स्वयंपाक करणाऱ्या अन्नपूर्णा होत्या. जगभरात विविध ठिकाणी त्यांचे दहा रेस्टॉरेंट आहेत. दुबईतील रेस्टॉरेंटमध्ये तर कधी कधी त्या स्वत: भारतीय जेवण बनवायच्या. शेफ कोट घालणे त्यांना फार आवडायचे. शेफ कोट घातला की जगातील सर्वात सुंदर पोशाख आपण धारण केला, असे त्यांना वाटायचे. दुबई व्यतिरिक्त लंडन, मँचेस्टर, बर्मिंघम, कुवैत, दोहा, कतार, बहरीन अशा ठिकाणी त्यांनी अस्सल भारतीय चवीचा आस्वाद देणारे रेस्टॉरेंट सुरू केले आहेत. Asha Bhosle आठ दशकांहून अधिक काळ आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही स्वराशा आता कायमची शांत झाली आहे.