वाशीम,
महाराष्ट्र मराठी भाषा विभागाचे सचिव तथा पालक सचिव Dr. Kiran Kulkarni डॉ.किरण कुलकर्णी यांनी ११ एप्रिल रोजी श्री मध्यमेश्वर भगवान मंदिराला भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, न.प. मुख्याधिकारी निलेश गायकवाड, व अधिकारी वर्ग यांची उपस्थिती होती.
Dr. Kiran Kulkarni यावेळी त्यांनी श्री मध्यमेश्वर भगवान चे दर्शन घेतले आणि मंदिराची पाहणी करून तेथील जुने अवशेष आणि मंदिराच्या इतिहासाबाबत माहिती घेतली. यावेळी बंडोपंत जहागीरदार, दिपक जहागीरदार, श्रीपाद लक्रस, लक्ष्मण इंगोले व मंदिराचे पुजारी सखाराम महाराज जोशी, स्मिता जोशी आरती मंडळ यांनी वत्सगुल्म महात्म्य आणि शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी त्यांनी मंदिराबाबत माहिती सागून जुने फोटो, संकलित माहिती त्यांना दाखवली.