जीपॅट परीक्षेत वाधवानी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
यवतमाळ, 
पी. कॉलेज ऑफ फार्मसी, गिरिजा नगर, यवतमाळ येथील बी. फार्म अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी GPAT exam जीपॅट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाचा गौरव वाढविला आहे. अखिलभारतीय स्थरावर घेण्यात आलेल्या या परीक्षेत मेहुल लांभाडे यांनी २८५ गुणांसह ऑल इंडिया रँक १२० मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली.
 
 
farmasi
 
GPAT exam  तसेच पायल गुर्नुले यांनी २४४ गुणांसह ऑल इंडिया ७४९, साक्षी जायसवाल यांनी २१५ गुणांसह ऑल इंडिया रँक १९३६, शुभम भावर यांनी १९१ गुणांसह ऑल इंडिया रँक ३७५०, श्रेया धुरंधर यांनी १७४ गुणांसह ऑल इंडिया रँक ५९०६ आणि संचित कन्नाके यांनी १४५ गुणांसह ऑल इंडिया रँक ११८९२ प्राप्त करून यश मिळवले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष जगदीश प्राचार्या डॉ. मनीषा किटुकले, डॉ. अनिल चांदेवार, प्राध्यापक व कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले. जीपॅट ही परीक्षा एम.फार्म पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा सुमारे १२,४०० शिष्यवृत्ती मिळते. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटला आहे.