मंगलवाडी येथे पाणपोईचा समाजोपयोगी उपक्रम

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
रिसोड, 
तालुक्यातील मंगलवाडी येथे तरुण श्रीचे सेवाधारी यांच्या वतीने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर 'Panpoi's social service initiative पाणपोईचा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहे. रखरखत्या उन्हात वाटसरू, प्रवासी, मजूर तसेच गरजू नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे.
 
 
panpoi
 
'Panpoi's social service initiative  पाणपोई ही परंपरा म्हणजे कडक उन्हाळ्यात तहानलेल्या प्रवाशांची तहान भागवण्यासाठी करण्यात येणारी निःशुल्क धर्मार्थ सेवा होय. समाजातील गरजू लोकांना दिलासा देणारी ही सेवा अत्यंत पवित्र, मानवतावादी आणि प्रेरणादायी मानली जाते. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून, तरुणांनी घेतलेला हा पुढाकार समाजासाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहे.