पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
यवतमाळ, 
भारतीय जनता पार्टी यवतमाळ शहर दक्षिण मंडळाच्यावतीने, स्थानिक केमिस्ट भवन येथे दोन दिवसीय निवासी कार्यशाळा झाली. संपूर्ण देशात जनता पार्टीच्या वतीने Pt. Deendayal Upadhyay Training Campaign पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून, यवतमाळ शहर दक्षिण मंडळ भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही दोन दिवसीय निवासी कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेच्या उद्घाटनाकरिता, यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके, नप गटनेता व यवतमाळ शहर अध्यक्ष नितीन गिरी, नप दत्ताकुलकर्णी, भाजपा सरचिटणीस राजू पडगिलवार, जिल्हा कार्यालय प्रभारी शंतनू शेटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 
Deendyal
 
या कार्यशाळेत पहिल्या दिवशी ४, तर दुसर्‍या दिवशी ३ सत्र घेण्यात आले. सातही सत्रांकरिता भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान, जिल्हा सरचिटणीस राजू पडगिलवार, विजय खडसे, जिल्हा सचिव प्रलय टिप्रमवार, यवतमाळ अर्बन बँक अध्यक्ष डॉ. खर्चे, जिल्हा सचिव सतीश मानलवार, नगरसेवक कीर्ती राऊत यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा समारोप भाजपा जिल्ह्याचे नेते व माजी मंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत झाला. या निवासी कार्यशाळेसाठी शहर कार्यकारणी, पदाधिकारी, सर्व आघाडी अध्यक्ष, महामंत्री, नगरसेवक, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग नोंदविला.
 
 
Pt. Deendayal Upadhyay Training Campaign  महिला प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था धाम येथे करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी भाजपा शहर अध्यक्ष नितीन गिरी यांच्या मार्गदर्शनात भाजपा सरचिटणीस अभिषेक श्रीवास, भाजपा सरचिटणीस प्रशांत देशमुख, शहर अध्यक्ष महिला आघाडी पुष्पलता सप्रे, शहराध्यक्ष युवा मोर्चा स्वप्निल उलंगवार, श्रीराम मेल्केवार आणि सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.