वडकी येथे योग भवन निर्मितीची मागणी

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
राळेगाव, 
तालुक्यातील वडकी येथील निरंतरम् Vadki: Yoga Bhavanयोगाभ्यास योग मंडळातील आठ योग साधकांचा वाढदिवस मार्च महिन्यात असल्याचे कारणाने या सामूहिक वाढदिवसाचे औचित्य साधून योग केंद्राचे योग शिक्षक ज्ञानेश्वर जवादे यांच्या संकल्पनेतून मार्च रोजी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक‘माचे आयोजन, वडकी येथील पुरातन आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेले प्रसिद्ध विठ्ठल रुक्मिणी आणि बजरंगबली देवस्थान पिंपळापुर रोड येथे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि हर्षो‘ासात झाले.
 
 
yog
 
या प्रसंगी निरंतरम् योग केंद्राचे सर्व योगसाधक आणि वडकी येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते काकडे यांचे उपस्थितीत सपन्न झाले. या प्रसंगी केंद्राचे योग शिक्षक ज्ञानेश्वर जवादे गुरुजींनी मनोगत व्यक्त करताना आजचे स्नेहभोज हे एक औचित्य असून मूळ उद्देश स्वामीजींच्या संकल्पनेनुसार योगाचा नि:शुल्क प्रचार आणि प्रसार करणे हाच आहे. योगामुळे मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक लाभ होऊन मनुष्याला परमानंद प्राप्त होतो. जीवनासाठी प्रत्येकाने योगाभ्यास केला योगाचे विस्तृत वर्णन करीत असताना गुरुजींनी उपस्थितांसमोर वडकी येथे योगाभ्यास मंडळास योगभवन नसल्याबाबत खंत व्यक्त केली.
 
 
 
Vadki: Yoga Bhavan यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय काकडे यांनी, मी योग भवनाचे निर्मितीकरिता पूर्ण क्षमतेने प्रयत्न करून राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या माध्यमातून वडकी येथे लवकरच योग भवनाची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले. प्रसंगी केंद्राचे ज्येष्ठ योगसाधक राजू कोंबे यांनी प्रत्येकाच्या जीवनात योगाची का आवश्यकता आहे, याबाबत विचार व्यक्त केले. त्यानंतर वडकी येथील स्मॉल वंडरच्या संचालक तथा प्राचार्य डॉ. मंजुषा सागर यांनी विचार व्यक्त करताना ग‘ामीण भागात निःशुल्क योगाचे वर्ग चालवून ज्ञानेश्वर जवादे गुरुजी उत्कृष्ट मानव सेवा करीत असल्याचे गौरव उद्गार काढले. हा कार्यक‘म महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी आणि हनुमंतरायाचे साक्षीने अतिशय आनंदी वातावरणात झाला. यासाठी निरंतरम् योगाभ्यास मंडळातील योग केंद्राचे सर्व योग साधकांनी अतिशय परिश्रम घेऊन कार्यक‘म साजरा केला.