अघोरी पूजनाने खळबळ

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
केळझरा अंतरगावच्या शेतशिवारात भीतीचे वातावरण
 
राजेश माहेश्वरी
 
आर्णी, 
Aghori Puja आर्णी तालुक्यातील केळझरा (कोमटी) व अंतरगाव शेतशिवारात अज्ञात व्यक्तींनी अघोरी जादूटोणा व पूजन धक्कादायक घटना रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी ११ च्या दरम्यान समोर आल्याने या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विविध चर्चांना उधाण आले आहे,
 
 
aghori
 
अंतरगाव व केळझरा (कोमटी) शेतशिवारात पांढर्‍या रंगाचा मोठा गोल घट आखून त्यात अघोरी पूजन केलेले दिसून आले. ही घटना कळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. अघोरी पूजेमध्ये अज्ञात महिलेचे सात पासपोर्ट फोटो आणि बाहुली झाडाला खिळ्यांनी टोचून ठेेवलेली होती. एक साडी ब्लाऊज, हळदी कूंकू, नारळ, लिंबू, खिळे, दाभण, टाचण्या आढळून आल्या. तसेच झाडावर चाकू, उदबत्ती, मातीची भांडी तसेच अज्ञात वस्तू आढळून आल्या.
 
 
Aghori Puja  हा सर्व प्रकार जादूटोणा किंवा अघोरी पूजनाशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या शेतकर्‍यांच्या निदर्शनास हा प्रकार आला आणि त्यांनी तत्काळ इतर ग‘ामस्थांना माहिती दिली. ग‘ामस्थांनी ही माहिती दिल्यावर आर्णी पोलिस ठाण्याचे जमादार प्रदीप खडके, अतुल पवार, अजय ठाकरे, पूजा गेडाम यांनी घटनास्थळी दाखल होऊन हे पूजा साहित्य जाळून टाकले. या घटनेची तक‘ार आर्णी पोलिसांकडे दाखल झालेली अघोरी पूजनाचे फोटो व व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज असल्याची जनभावना आहे.
परिसरात भीतीचे वातावरण
या शेतशिवारात कापलेला कोंबडा, साडी, ब्लाऊज, नारळ, फोटो, दाभण, टाचणी, खिळे, रंग, पीठ, चाकू, अंडे, शेला घटनास्थळी आढळून आले. प्रत्येक फोटोला दाभण, खिळे व टाचण्या टोचलेल्या होत्या. सोबतच ४ ते ५ बाहुल्या त्याही खिळे टोचलेल्या होत्या. आर्णी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने हे सारे साहित्य गोळा करून जाळून टाकले आहे.
आकाश राठोड / प्रत्यक्षदर्शी