छाेटे कपडे घालण्यावरुन प्रियकारने केला छळ

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
- एअर हाेस्टेस प्रेयसीची आत्महत्या : प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
 
अनिल कांबळे
नागपूर, 
‘तू छाेटे-छाेटे कपडे घालू नकाेस, मला ते आवडत नाही. जर तू छाेटे कपडे घालशील तर मी तुझ्यशी लग्न करणार नाही आणि तुझी बदनामी करेल,’ अशी धमकी डाॅक्टर असलेल्या प्रियकराने दिल्यामुळे Air hostess suicide एअर हाेस्टेस असलेली प्रेयसी नैराश्यात गेली. प्रियकराच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून घरात गळास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एअर हाेस्टेसच्या बहिणीच्या तक्रारीवरुन लकडगंज पाेलिसांनी आराेपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला. रितेश राजकुमार वांदिले (26, रा. बहिणाबाई नगर, परसाेडी, उमरेड) असे आराेपीचे नाव आहे तर गायत्री उफर् गाैरी (28) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
 
 
skudsk
गाैरी ही व्यवसायाने Air hostess suicide  हवाई सुंदरी हाेती. त्यामुळे तिला छाेटे कपडे घालून नाेकरी करावी लागत हाेती. त्यानंतर तिला छाेटे कपडे घालण्याचे बंधन हाेते. तिचे डाॅक्टर असलेल्या रितेश वांदिले याच्यासाेबत प्रेमसंबंध हाेते. रितेश हा गाैरीवर छाटे कपडे परिधान करण्यावरुन वारंवार तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत हाेता. मात्र, गाैरीने आपला ताे कार्यालयीन पाेशाख असल्याचे सांगून त्याची समजूत घालत हाेती. ताे तिला वारंवार मानसिक त्रास देत हाेता. छाेटे कपडे घालू नकाेस, असा ताे दबाव टाकत लग्न न करण्याची धमकीही देत हाेता. रितेशने गाैरीला माेबाईलवरुन केलेल्या व्हिडिओ काॅलमधून गाैरीच्या कुटुंबियांबद्दलही अपमानास्पद वक्तव्य केल्याचेही समाेर आले. सततचा वाद, अपमानास्पद वागणूक आणि लग्नास नकार यामुळे त्रस्त हाेऊन गाैरीने टाेकाचे पाऊल उचलल्याच्या आशयाची तक्रार गाैरीच्या कुटुंबियांनी केल्यानंतर पाेलिसांनी रितेश वांदिले विराेधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
 
व्हिडिओ काॅल करुन आत्महत्या
गाैरीचे आईवडिल 4 एप्रिलला भंडारा शहरात लग्नसमारंभासाठी गेले हाेते. त्यामुळे गाैरी एकटीच घरी हाेती. यादरम्यान डाॅ. रितेश याने तिला व्हिडिओ काॅल करुन लग्न न करण्याची धमकी दिली. तसेच तिच्या आई-बहिणीवर आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला हाेता. त्यामुळे गाैरीने तणावाखाली येत गळास घेऊन आत्महत्या केली.