मुंबई
Asha Bhosle death भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. शनिवारी त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रमाणेच आशा भोसले यांनीही आपल्या सुरांनी संगीत क्षेत्राला सजवले त्यांनी कित्येक आयकॉनिक गाण्यांना आवाज दिला.
काल, संध्याकाळी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, ऑरगन फेल झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून लोअर परळला त्यांच्या निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. त्यानंतर 4 वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
मुलाने दिली निधनाची बातमी
आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांनी आईच्या निधनाची बातमी दिली आहे. माझी आई आशा भोसले यांचं निधन झाले आहे. उद्या चार वाजता शिवाजी पार्कात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचं पार्थिव राहत्या घरी ठेवणार आहे असे आनंद भोसले यांनी म्हटले आहे.