मुंबई
Asha Bhosle चिरतरुण आवाज लाभलेल्या आशा भोसले या सोशल मीडियावरही खूप ॲक्टिव्ह होत्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या, त्यांच्या चाहत्यांच्या आणि अनुयायांच्या संपर्कात होत्या. इंस्टाग्रामवरील त्यांची शेवटची पोस्ट १८ मार्च रोजी होती. या पोस्टमध्ये आशाताईंनी जीवनाचा अंत आणि मुक्ती याबद्दल बरंच काही लिहीलं होतं. आशा भोसले यांच्या निधनानंतर, त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली असून ती चर्चेचा विषय ठरली आहे.

Asha Bhosle १८ मार्च रोजी त्यांनी ही शेवटची पोस्ट लिहीली, त्यासह त्यांचा एक फोटोही दिसतोय. आपल्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, आशा भोसले यांनी आंतरराष्ट्रीय बँड गोरिलाझसोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या पार्श्वभूमीवर एक भारतीय वस्ती, हत्ती आणि तुटलेल्या वस्तू दिसतात. या फोटोमध्ये त्या खूप शांत आणि साध्या रुपात दिसल्या. फोटोसह त्यांनी भलीमोठ्ठी कॅप्शन लिहीली होती. Asha Bhosle द शॅडॉई लाईट हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. वाराणसीला जाऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठावरून प्रवास करून, मी जे पाहिलं ते बारकाईने समजून घेतल्यावर, मला जीवनाचा अर्थ कळला, मी कोण आहे आणि या पृथ्वीवर मला काय करायचे आहे ( हे मला समजलं) असं त्यांनी लिहीलं. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आपल्या संगीत साधनेचं वर्णन, हे जीवनाची नदी पार करण्यास मदत करणाऱ्या नावाड्यासमान केलं.
Asha Bhosle पुढे आशा भोसले यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, जेव्हा मी नदीच्या पलीकडे पोहोचेन, तेव्हा माझा प्रवास पूर्ण होईल. मला मोक्ष मिळेल आणि आपल्या सभोवताली तरंगणाऱ्या हजारो आवाजांचा मी एक भाग बनलेले असेन. आशा भोसले यांच्या या शब्दांवरून असं वाटतं की कदाचित त्या आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यासाठी आध्यात्मिक रित्या तयार होत होत्या. त्या निसर्गाशी एकरूप होण्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, असंही त्यांनी लिहीलं होतं. द शॅडोई लाईट या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी आपला संपूर्ण वारसा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला .