६७ हजार ५९९ विद्यार्थी देणार पीएटी

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
वेळापत्रकाच्या तारखांतील गोंधळाने उडाली होती खळबळ
 
वर्धा, 
नियतकालिन Assessment test  मूल्यांकन चाचणी ही राज्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची मानली जाणारी परीक्षा आहे. पण या चाचणीचे वेळापत्रक जाहीर करताना तारखांत राज्य पातळीवरूनच गोंधळ झाल्याने जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. असे असले तरी ११, १५ व २२ एप्रिलला ही चाचणी होणार असून जिल्ह्यातील ६७ हजार ५९९ विद्यार्थी ही चाचणी देणार आहे. त्यासाठीची तयारी शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे.
 
 
Assessment test
 
नियतकालिक Assessment test मूल्यांकन चाचणी ही दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा, गणित आणि इतर मुख्य विषयांच्या शिकण्याचे फलित तपासण्यासाठी घेतली जाते. या चाचण्या शाळांना स्वतःहून न घेता एससीईआरटीच्या निर्देशानुसार विशिष्ट वेळापत्रकानुसार घेतल्या जातात. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील कमतरता शोधून त्यावर सुधारणा करणे हा या चाचणीचा उद्देश आहे. या चाचण्यांमुळे शिक्षकांना अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यास व पालकांना मुलांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यास मदत होत असून ११, १५ व २२ एप्रिला नियतकालीन मूल्यांकन चाचणी घेतली जाणार आहे. संबंधित चाचणीच्या अनुषंगाने एससीईआरटी पुणे तर्फे जिल्ह्यातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरशा प्रमाणात प्रश्न पत्रिकाही वर्धा जिल्ह्याच्या आठही तालुयांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. शिवाय जिल्ह्यातील कुठल्या तालुयाकडून प्रश्न पत्रिकेची कमी-जास्त मागणी १० रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नोंदविण्यात आली नव्हती. जिल्ह्यातील राज्य मंडळांच्या शाळांत ही चाचणी होणार आहे.
 
 
नियतकालिक Assessment test  मूल्यांकन चाचणी जिल्ह्यात पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथ.) सीमा पाटील यांच्या मार्गदर्शनात शिक्षण विभागाने अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहे. सुरूवातीला ही चाचणी असून ११, १५ व २२ एप्रिला होणार असे आदेश निर्गमित करून राज्य स्तरावरील अधिकार्‍यांकडून स्पष्ट करण्यात आले होते. पण नंतर ११, १६ व २२ एप्रिलला ही चाचणी होईल असे आदेश निर्गमित करण्यात आले. तर नंतर सारवासारव करून पुन्हा ११, १५ व २२ एप्रिलला ही चाचणी होईल असा आदेश काढण्यात आल्याने शिक्षण विभागाचीही एकच तारांबळ उडाली होती.
कुठल्या वर्गाचे किती विद्यार्थी देणार पीएटी
दुसरी : १०,९७७
तिसरी : ०८,७०८
चौथी : १०,०८९
पाचवी : १२,९७६
सहावी : ११,४४८
सातवी : १०,२७९
आठवी : १२,१२२