‘टीमसाठी निर्णय मान्य’, आयुष म्हात्रेने ‘रिटायर आउट’ प्रकरणावर दिले स्पष्टीकरण

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ayush-mhatre : इंडियन प्रीमियर लीग दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाने घेतलेल्या ‘रिटायर आउट’ निर्णयावर मोठी चर्चा रंगली असताना, युवा फलंदाज आयुष्य म्हात्रे याने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 

ayush-mhatre 
 
 
एका सामन्यात सीएसके संघाने रणनीतीचा भाग म्हणून आयुष म्हात्रेला ‘रिटायर आउट’ करून त्याच्या जागी शिवम दुबेला फलंदाजीसाठी पाठवले होते. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आणि क्रिकेट वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
 
मात्र, या प्रकरणावर बोलताना म्हात्रेने सांगितले की, हा निर्णय पूर्णपणे संघाच्या हितासाठी घेण्यात आला होता आणि त्याने तो सहज स्वीकारला. “संघासाठी जे योग्य आहे, तेच महत्त्वाचे. मला कोणतीही अडचण नाही,” असे तो म्हणाला.
 
त्याने पुढे सांगितले की, संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराचा निर्णय अंतिम असतो आणि प्रत्येक खेळाडूने त्याचा आदर करणे गरजेचे आहे. संघ जिंकणे हेच सर्वात महत्त्वाचे ध्येय असल्याचेही त्याने नमूद केले.
 
सीएसकेच्या या निर्णयामागे शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करण्याचा विचार होता. शिवम दुबे हा मोठे फटके मारण्यात तरबेज असल्यामुळे त्याला मैदानात उतरवण्यात आले. एकूणच, या स्पष्टीकरणानंतर ‘रिटायर आउट’ प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता असून, संघाच्या रणनीतीला खेळाडूंचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले आहे.