वणी,
स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘Bharat Talent Search Exam’ ‘भारत टॅलेंट सर्च २०२६’ या राज्यस्तर स्पर्धा परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परीक्षेत वणी तालुक्यातील विविध शाळांमधील तब्बल ६६३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एज्युकेट अकॅडमी (म.रा.) यांच्या वतीने आयोजित, ही परीक्षा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विविध केंद्रांवर घेतली जाते.
‘Bharat Talent Search Exam’ इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा अनुभव मिळावा, त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास व्हावा आणि ज्ञानात भर पडावी हा या उपक‘माचा मु‘य उद्देश आहे. याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे व विशेष उपक‘मांद्वारे गौरविण्यात येणार आहे. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक म्हणून सुभाष गोंडम, विनोद नारे, आकाश खोब‘ागडे व मनिष तागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. परीक्षेदरम्यान सोहेलमणी सिमा ठोंबे, निलिमा ढाके, सुजाता भगत, कांचन गोंड, राहत मलिक, ज्योत्स्ना बोधनें, सविता वानखेडे, वर्षा तेजे व जयवंत अवचार यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. या परीक्षेसाठी प्राचार्य अन्नपूर्णा मडावी, उपप्राचार्य विकी मोहनाणी, शिक्षक व कर्मचार्यांनी सहकार्य केले.