भीषण अपघातात बहिण भावाचा जागीची मृत्यू: आई गंभीर जखमी

नवेगाव बांध परिसरातील घटना

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
गोंदिया,
horrific accident दुचाकी ने जात असलेल्या बहीण भावाच्या जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी झाल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध परिसरात शनिवारी ११ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. अंकुर अरुण शहारे (१८) रा.देवरी आणि रितिका संजय जांभुळकर (१०) रा. चारभाटा/बोरगाव ता. देवरी असे मृत बहिण भावाचे नाव आहे. तर अरुणा अरुण शहारे (५०) रा. देवरी असे गंभीर जखमी आईचे नाव आहे. जखमीला तात्काळ गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.
 
 
horrific accident
 
मिळालेल्या माहितीनुसार जखमी अरुणा ह्या मुलगा अंकुर व भाची रितिका यांच्यासह दुचाकीने देवरी येथून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोडदे येथे नातेवाईकांकडे लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. दरम्यान, सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नवेगावबांध ते पांढरवाणीदरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अंकुर व रितिका दोघेही वाहनाच्या चाकाखाली आल्याने त्यांचा अक्षरशः चेंदामेंदा होत जागीच मृत्यू झाला. तर अरुणा गंभीर जखमी झाल्या. horrific accident घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अरुणा यांना उपचाराकरिता गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती नवेगावबांध पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 
भविष्याचा आधार हरपला...
मिळालेली माहितीनुसार अरुणा ह्या मुलगा अंकुर यांचेसह देवरी शहरातील वॉर्ड क्र. १४ येथे वास्तव्याला असून त्यांची भाची रितिका ही त्यांच्या सोबतच राहून देवरी येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. विशेष म्हणजे, कोरोना काळात त्यांचे पती अरुण शहारे यांचे निधन झाले होते. horrific accident त्यामुळे घराची जबाबदारी ही अरुणा यांच्यावर असताना मुलगा अंकुर हा त्यांच्या भविष्याचा आधार होता. मात्र त्याचाही अपघाती मृत्यू झाल्याने अरुणा ह्या एकाकी पडल्या आहे.