पुसद,
येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक २०२५-२६ मध्ये शालेय उपक्रमांबरोबर विविध सहशालेय उपक‘म आणि Competitive exam स्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या २९० विद्यार्थ्यांचा एकत्रित सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण सचिव तथा गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या संचालक अश्विनी अनिरुद्ध चोंढीकर होत्या. प्राचार्य रामचंद्र हिरवे, उपप्राचार्य दत्तात्रय जीवने, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक प्रा. गजानन जाधव उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांनी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज व लोकनेते देवराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सचिन नालींदे यांनी विद्यालयाचा शैक्षणिक वारसा पुढे नेत असताना ज्या विश्वासाने पालकांनी आमच्या शाळेत विद्यार्थी पाठवले आहेत, तो विश्वास पूर्णत्वास नेण्याचा आमचा संकल्प असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानावरून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना अश्विनी चोंढीकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांना निसर्गतः मिळालेल्या बुद्धीचा योग्य वापर करून तिला चालना दिल्यास विद्यार्थी यशोशिखराकडे वाटचाल करण्यासाठी तयार होतात. त्यासाठी विद्यार्थ्यांंनी चिकाटी निरंतर अभ्यास या गुणांची पराकाष्ठा करावी, आमचे शिक्षक सदैव आपल्या पाल्याचे हित जपण्यास कटिबद्ध आहेत.
Competitive exam त्यानंतर विद्यालयात झालेल्या प्रत्येक विषयातील ऑलिंपियाड परीक्षेत सुवर्णपदक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गणित संबोध, एनएमएमएस, शिष्यवृत्ती परीक्षा, विज्ञान प्रदर्शनात सहभाग, क्रीडा स्पर्धेतील विजयी विद्यार्थी, चित्रकला स्पर्धा, कलारत्न शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय येथील रासेयोतील छकुली मांगीलाल पवार, विभागस्तर आदर्श स्वयंसेवक पुरस्कारप्राप्त व विभागीय शिबिरात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणार्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक‘माचे संचालन व आभारप्रदर्शन सारंग कोरटकर यांनी केले. कार्यक‘मासाठी आयोजक प्रा. असिफ शेख व सचिन नालिंदे यांनी पुढाकार घेतला. यावेळी पालक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.