अनिल कांबळे
नागपूर,
'Digital arrest': Fraud शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील 76 वर्षीय निवृत्त डाॅक्टरला सायबर गुन्हेगारांनी बनावट कागदपत्रे आणि पाेलिस कारवाईची भीती दाखवत तब्बल 2.01 काेटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मार्च राेजी पीडित डाॅक्टरला अज्ञात व्यक्तींचा फोन आला. आराेपींनी त्यांचा माेबाईल नंबर बेकायदेशीर कामांसाठी वापरला जात असल्याचे खाेटे सांगितले. विश्वास बसावा यासाठी त्यांनी पाेलिस, बँक आणि रिझर्व्ह बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे आणि अटक वाॅरंट पाठवले.
'Digital arrest': Fraud आराेपींनी डाॅक्टरला धमकी देत त्यांची बँक खाती तपासासाठी गाेठवली जातील, असे सांगितले. तसेच व्हिडिओ काॅलद्वारे त्यांना ‘डिजिटल अटक’ केल्याचा भास निर्माण करून दबाव टाकला. या भीतीपाेटी पीडिताने आराेपींनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. 23 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान त्यांनी एकूण 2,01,60,647 रुपये पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिताने सायबर पाेलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नाेंदवण्यात आला असून पाेलिसांनी तपास सुरू केला आहे. आराेपींनी वापरलेले माेबाईल नंबर आणि बँक खात्यांची माहिती घेणे सुरु आहे. ज्येष्ठ नागरिकांनी अनाेळखी फोनवर विश्वास ठेवू नये आणि पैशांची मागणी करणाèयांपासून सावध राहावे, असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.