हिंगणघाट,
Dr. Ambedkar Statue Area शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देत सामाजिक जाणीव, समता आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने साकारण्यात आलेल्या विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाचे लोकार्पण झाले. आ. समीर कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत १ कोटीच्या निधीतून साकारलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ११ रोजी करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांची उपस्थिती होती. या प्रकल्पांतर्गत पुतळा परिसराचे सर्वंकष आणि नियोजनबद्ध सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आकर्षक वास्तुरचना, सुसज्ज पायाभूत सुविधा, आधुनिक प्रकाश योजना, स्वच्छता व्यवस्थापन, हरितीकरण, पादचारी मार्गांची उभारणी, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, न्याय आणि शिक्षणाच्या विचारांचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा परिसर प्रभावी माध्यम ठरत आहे.
Dr. Ambedkar Statue Area यावेळी ना. संजय शिरसाट यांनी हिंगणघाट शहराच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. विकासाच्या कामांमध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनीही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांचा प्रभावी वापर करून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सांगितले. आ. कुणावार यांनी, हिंगणघाटचा विकास हा आपला संकल्प असून प्रत्येक नागरिकाला उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार, असे नमूद केले. या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यवृद्धीसोबतच नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यत केला.
याप्रसंगी खा. अमर काळे, नप उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, बांधकाम समिती सभापती वामन मावळे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, विजय आगलावे, नगरसेवक सोनू गवळी, नगरसेवक अतुल नंदागवळी, अनु सोमकुंवर आदी उपस्थित होते.
मुंबईचे गायक राहुल साठे यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थितांना भारावून टाकले.