डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक पोलिसांचा चोख बंदोबस्त

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंगळवार १४ रोजी शहरात अवजड वाहतूक पहाटे ५ ते रात्री १२ वाजतापर्यंत बंद राहणार आहे. तसेच छोटी वाहने मिरवणुकीत येऊ नये, यासाठी शहरातील वर्दळीच्या चौकात वाहतूक पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. चौकाचौकांत रॅली, डिजेचा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे.
 
 
baba shaheb
 
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  शहरालगतच्या गावातील नागरिकसुद्धा सायंकाळी रॅलीमध्ये सहभागी होतात. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, अपघात होऊ नये, याकरिता पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या आदेशाने वाहतूक पोलिसांनी शहरातील चौकाचौकात पोलिस बंदोबस्त लावून नियोजन केले आहे. जड वाहतूक शहरामध्ये सायंकाळी प्रवेश करू नये म्हणून जुनापाणी चौक, धुनिवाले मठ, उड्डाणपुल, आरती चौक येथे सायंकाळी ४ ते रात्री १२ वाजतापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. डॉ. बाबासाहेब आबेडकर चौक, पोस्ट ऑफिस चौक, गांधी पुतळा, बापूराव देशमुख पुतळा, बजाज चौक ते आदित्य मेडिकल या चौकात बॅरिकेट लावण्यात येणार आहे. त्यामुळे हे चौक बंद राहणार आहेत. तर बजाज चौक-निर्मल बेकरी- सोशालिस्ट चौक- आदित्य मेडिकल-शिवाजी चौक-आरती चौक- धुनिवाले मठ, विश्राम भवन-आरती चौक-शिवाजी चौक- बजाज चौक, इंदिरा गांधी चौक- शिवाजी चौक- बजाज चौक, आदित्य मेडिकल चौक- सोशालिस्ट चौक- निर्मल बेकरी चौक-बजाज चौक, उड्डाणपुल या मार्गाने वाहतूक शहराबाहेर वळविण्यात येणार आहे.