डॉ. प्रवीण तोगडिया यांचा वर्धेत भव्य नागरी सत्कार उद्या

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करावे, संपूर्ण देशात गोहत्या बंदीचा कायदा आणावा, समान नागरी संहिता कायदा लागू करावा, बांगलादेशी घुसखोरांना हाकलून लावणे, १ लाख हनुमान चालिसा केंद्रे सुरू करणे आदी संकल्प घेऊन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष  Dr. Praveen Togadia डॉ. प्रवीण तोगडिया हे संपूर्ण देशभर दौरा करत आहेत.
 
 
Dr. Praveen Togadia
 
Dr. Praveen Togadia  दरम्यान, १३ व १४ एप्रिल रोजी दोन दिवसीय त्यांचा वर्धेत भरगच्च कार्यक्रम असून प्रयागराजच्या कुंभमेळ्यात त्यांनी केलेल्या सेवाकार्याची दखल घेऊन, मंगळवार १४ रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत अनेकान्त स्वाध्याय मंदिरात त्यांचा वर्धेकरांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी डॉ. प्रवीण तोगडिया हे वर्धा वासीयांशी विविध विषयांवर चर्चाही करणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष अनूप जैस्वाल, राजेश सराफ, मिलन गांधी, शार्दुल वंदळे, शिवसेनेचे तरुण शर्मा, शालिग्राम टिबडीवाल, गिरीश उपाध्याय, ब्रजकिशोर पंड्या, कमल कुलधरिया, मुरली केला, आशिष तिवारी, कन्हैया मुरली, प्रमोद चैनानी, विनय जयस्वाल, आदींनी केले आहे.