जीवाची सेवा हाच जीवनाचा मंत्र असावा

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांचे प्रतिपादन

वणी, 
जिवाची सेवा हाच जीवनाचा मंत्र असावा. रुग्णसेवा करताना कृती आणि आचरण यांचा मेळ साधल्यास जीवन समृद्ध होते, असे प्रतिपादन नरकेसरी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री विलास डांगरे यांनी केले. त्यांच्या होमिओपॅथीप्रती असलेल्या प्रेमामुळे त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार त्यांनी या क्षेत्रालाच समर्पित केल्याचे सांगितले. होमिओपॅथीचे जनक महर्षी डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २७१ व्या जयंतीनिमित्त वणी येथे जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय देरकर, तर मुख्य अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून Dr. Vilas Dangre  डॉ. विलास डांगरे उपस्थित होते.
 
 
Dr Dangare
 
Dr. Vilas Dangre  डॉ. डांगरे यावेळी पुढे म्हणाले, अत्यंत गरीब कुटुंबात जन्म घेऊनही हॅनिमन यांनी प्रचंड संघर्ष करत वयाच्या २४ व्या वर्षी एमडी पदवी संपादन केली. वैद्यकीय सेवेत १२ वर्षे कार्य केल्यानंतरही रुग्णसेवेबाबत मनात समाधान नसल्याची भावना निर्माण झाली. त्यातूनच औषधांच्या शोधात असताना ‘सिंकोना’ या औषधामुळे त्यांच्या मोठी कलाटणी मिळून होमिओपॅथीचा पाया रचला गेला. कार्यक‘मात आमदार संजय देरकर यांनीही आपल्या मनोगतात वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावाचे महत्त्व अधोरेखित केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून समाजसेवेचा मार्ग स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. विलास डांगरे यांच्या हस्ते मागील ४० ते ५० वर्षांपासून ग्रामीण भागात सेवा देणार्‍या ज्येष्ठ डॉक्टरांचा सत्कार त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वरा शेडामे यांनी स्वागत नृत्य सादर केले, तर ज्येष्ठ डॉ. शोभा सुराणा व त्यांच्या चमूने स्वागतगीत सादर केले. डॉ. उजामा शाह, डॉ. प्रांजल दुधलवार व डॉ. शिरीन खान यांनी होमिओपॅथीविषयी तसेच डॉ. हॅनिमन यांच्या कार्याची माहिती चलचित्राद्वारे सादर केली.
 
 
यावेळी आयुर्वेद डॉक्टर अध्यक्ष डॉ. रमेश सपाट, आयएमए संघटनेचे सचिव डॉ. संकेत अलोणे, होमिओपॅथी संघटनेचे अध्यक्ष डॉ. किशोर पेचे तसेच नागपूरचे डॉ. डोये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. अर्शद शाह यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रज्ञा महाजन यांनी व आभारप्रदर्शन डॉ. अस्मिता थाटे यांनी केले. या कार्यक‘माला वणी, झरी व मारेगाव होमिओपॅथ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.