नागपूर ठरत आहे गांजा-ड्रग्ज तस्करीचे केंद्र !

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
- 20 काेटींचा गांजा जप्त, एनसीबीचा छापा

अनिल कांबळे
नागपूर, 
Drugs and marijuana smuggling center नागपूर शहर आता ड्रग्ज आणि गांजा तस्करीचे केंद्र बनत आहे. नारकाेटिक्स कंट्राेल ब्युराे (एनसीबी)विभागाने नागपुरात माेठी कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करी रॅकेटचा छडा लावला. एका ट्रकमधील धातूच्या पत्र्यांमध्ये (मेटल शीट्स) अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेला सुमारे 210 किलाे गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत अंदाजे 20 काेटी रुपये आहे. ही कारवाई 11 एप्रिलला करण्यात आली. शहरात यापूर्वीही गांजा, एमडी आणि काेकेनसारख्या अमली पदार्थांवर किरकाेळ कारवाई हाेत असली, तरी माेठ्या तस्करीच्या मुख्य नेटवर्कपर्यंत स्थानिक पाेलिस पाेहाेचत नसल्याचे चित्र आहे. या कारवाईत पी. कुमार आणि आर. कुमार यांना अटक करण्यात आली आहे. यानंतर नागपुरातील स्थानिक सप्लायर पाटील आणि बर्मा यांनाही अटक करण्यात आली आहे.

ganja
 (संग्रहित छायाचित्र )
Drugs and marijuana smuggling center  सूत्रांच्या माहितीनुसार, ओडिशातील संभलपूर परिसरातून गांजाची तस्करी करण्यात येत हाेती. आराेपी पी. कुमार आणि आर. कुमार यांनी एका ट्राकची बनावट शिताीने केली हाेती. ट्रकच्या तळातील पत्र्यामध्ये गांजा ठेवण्यासाठी रिकामी जागा तयार केली हाेती. त्यात गांजा लपवून ठेवण्यात आला हाेता. त्यामुळे वरवर बघता ट्रकमध्ये काहीच मुद्देमाल दिसत नव्हता. मात्र, पक्की माहिती असल्यामुळे एनसीबीने सापळा रचला. ही कारवाई अत्यंत गुप्तपणे पार पडली असून एनसीबीने स्थानिक पाेलिसांनाही याची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. एनसीबीच्या पथकानेच आराेपींना अटक करून पुढील तपास स्वतःकडे ठेवला आहे. तपासात समाेर आले आहे की, जप्त करण्यात आलेला गांजा नागपूरसह अमरावती, अकाेला, नाशिक, पुणे आणि मुंबई येथे पुरवठा करण्याचा तस्करांची याेजना हाेती. त्यानंतर छाेट्या पातळीवरील पेडलर्सर्माफत हा माल ग्राहकांपर्यंत पाेहाेचवला जाणार हाेता. एनसीबी अधिकाèयांच्या माहितीनुसार, या आंतरराज्यीय तस्करी नेटवर्कमधील इतर सदस्य आणि संपूर्ण पुरवठा साखळी उघड करण्यासाठी तपास सुरू आहे.
नागपूरवर एनसीबीची करडी नजर
नागपुरातून अन्य राज्यात गांजा आणि ड्रग्ज तस्करी करण्यात येते. मात्र, येथील पाेलिस यंत्रणा हवी तेवढी सक्षम नसल्याचा गैरायदा तस्कर उचलतात. एनसीबीच्या या कारवाईमुळे नागपूर हे ड्रग्ज तस्करीसाठी महत्त्वाचे केंद्र बनत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांची शहरावर करडी नजर असून आगामी काळात अशा कारवाया आणखी तीव्र हाेण्याची शक्यता आहे.
‘टास्क फोर्स’ ठरताेय पांढरा हत्ती?
राज्याचे दुसरे ट्रास्क फोर्स पथक नागपुरात आहे. या पथकाचे कार्यक्षेत्र खूप माेठे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या पथकाची हवी तेवढी कामगिरी दिसत नाही. तसेच या पथकात जवळपास सर्वच कर्मचारी नागपूरमधील आहेत. त्यामुळे या पथकाला नागपूर बाहेरची माहितीच मिळत नाही, त्यामुळे टास्क फोर्स केवळ पांढरा हत्ती ठरत असल्याची चर्चा आहे.