अकरा वर्षीय बालिका एकटीच निघाली बिहारकडे

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
अन् रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने दिला मदतीचा हात

नागपूर,
Eleven-year-old girl leaves for Bihar alone मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकाच्या चौकशी कक्षात अकरा वर्षीय मुलगी बक्सरला जाणार्‍या ट्रेनबाबत विचारपूस करताना आली. या मुलीस ना व्यवस्थित काही सांगता येत होते, ना लिहिता बोलता येत होते, त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ड्युटीवर असलेल्या महिला प्रधान आरक्षक स्नेहल यांना संबंधित मुलीला पाहून संशय आला. बक्सरला जाणार्‍या ट्रेनबाबत चौकशी करताना ती रविवारी सकाळी ११ वाजता दिसून आली, मात्र तिच्यासोबत कोणीही नसल्याने आरपीएफ कर्मचार्‍यांनी चौकशी केली असता ती रेल्वे स्थानकावरून थेट बिहारला जाण्यासाठी निघणार असल्याची माहिती मिळाली.
 
 
railway-one
मुख्यत: पालक किंवा नातेवाईक दुसरे कुणीही नसल्याचे लक्षात येताच आरपीएफ कर्मचार्‍यांनी अधिक लक्ष घातले. तसेच तिच्यासोबत काहीही अघटित होण्याचा धोका लक्षात घेऊन तिला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने मदतीचा हात दिला अन् तिची शासकीय बालिका सुधार गृहात केली.
Eleven-year-old girl leaves for Bihar alone  दरम्यान मुलीने सांगितले की, ती ७ एप्रिल रोजी आपल्या बहिणीसोबत नागपुरात आली होती. मात्र, बहिणीने तिला परत जाण्यासाठी पैसे देऊन एकटेच बसव्दारे नागपूरला पाठविले. त्यानंतर ती रेल्वे स्थानकावर पोहोचली. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली. अल्पवयीन आणि एकटी असल्याने तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिला कर्मचार्‍यांनी तिला नागपूर आरपीएफ आणले. उपनिरीक्षक पूजा सूर्यवंशी यांनी चाइल्ड लाइन प्रतिनिधी नितेश सांगोडे यांच्या उपस्थितीत तिची सविस्तर चौकशी केली.
चौकशीत मुलीने आपले नाव नंदनी (वय ११ वर्षे आणि पत्ता कोरानसराय, जिल्हा बक्सर, बिहार) असे सांगितले. मात्र, तिला पालकांचा मोबाईल क्रमांक किंवा बहिणीचा पत्ता याबाबत कोणतीही माहिती देता आली नाही.
प्रवासादरम्यान या बालिकेसोबत धोका होऊ नयेत,यासाठी उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी आरक्षक उषा उइके यांच्या मदतीने शासकीय वाहनातून शासकीय बालिका सुधारगृह, काटोल नाका येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले असून पालकांशी संपर्क केल्यानंतर तिला तिच्या कुटुंबात परत पाठविले जाणार असल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली.