आर्णी,
Farmer suicide case बंडू नथ्थू जाधव या शेतकरी पुत्राने १८ मार्च रोजी विषारी औषध केल्याने तत्काळ उपचारासाठी यवतमाळला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र २५ मार्च रोजी उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा उघड्यावर पडले. या घटनेमुळे गावात हळहळ आहे. आर्णीचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, नायब तहसीलदार उदय तुंडलवार, नायब तहसीलदार प्रमोद गुल्हाने व तलाठी कैलास वाकेकर यांनी कुटुंबाच्या कुडमातीच्या साध्या घरात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
Farmer suicide case कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा त्यांनी दिला. विशेषतः घरातील चिमुकल्या मुलीला जवळ घेत तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी चिमुकलीशी संवाद साधला व तिला धीर देण्याचा केला. या भावनिक क्षणामुळे सर्वजण भावुक झाले होते. प्रशासनाकडून शक्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदारांनी यावेळी दिले. या भेटीमुळे दुःखात बुडालेल्या कुटुंबाला काहीसा आधार मिळणार आहे. दरम्यान आत्महत्या हा काही संकटावर उपाय नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर यांनी आत्महत्येचा विचार मनात आणू नये. तुम्हाला काही अडचण असेल आम्हाला सांगा आम्ही ती अडचण सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आवाहन यावेळी तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी केले. आत्महत्याग‘स्त कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पांगरीचे ग्रामस्थ मोठ्या सं‘येने उपस्थित होते.