उन्हाच्या तडाख्यात सावलीचा शोध

उष्णतेपासून बचावासाठी रविनगर येथे पुलाखाली गायींचा आसरा

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
नागपूर,
scorching sun शहरातील वाढत्या उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठ कॅम्पस चौकाला भोले पेट्रोल पंपाशी जोडणाऱ्या कै. ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकर उड्डाणपुलाखाली, रविनगर चौक परिसरात काही गायी सावलीसाठी आश्रय घेताना दिसून आल्या. दुपारच्या कडक उन्हामुळे रस्त्यावरील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असून, उघड्यावर फिरणाऱ्या गायींनी पुलाखालील थंड सावलीत थांबणे पसंत केले. वाहतुकीने गजबजलेल्या या रस्त्यावर असे दृश्य पाहून नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
 
nagpur
 
स्थानिक नागरिकांच्या मते, शहरात भटक्या जनावरांसाठी योग्य व्यवस्थेचा अभाव असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. विशेषतः दुपारच्या वेळेत गायी, कुत्रे यांसारखी प्राणी पुलाखाली, झाडांच्या सावलीत किंवा इमारतींच्या आडोशाला थांबताना दिसतात. यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता असून, अपघाताचा धोका वाढत आहे. scorching sun काही वाहनचालकांनी सांगितले की, अचानक रस्त्यावर येणाऱ्या जनावरांमुळे अपघात होण्याची भीती कायम असते. नागपूर महानगरपालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या जनावरांसाठी निवारा तसेच पाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सौजन्य: अश्विनी वानखेडे, संपर्क मित्र