यवतमाळच्या घनकचरा प्रक्रिया केंद्रात आग

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
परिस्थिती नियंत्रणात
 
यवतमाळ, 
Fire at Yavatmal solid waste center यवतमाळ नगर परिषद मार्फत शहरातील घरगुती तसेच वाणिज्यिक आस्थापनांमधून संकलित होणार्‍या घनकचर्‍यावर सावरगड येथील घनकचरा प्रक्रिया केंद्रामध्ये नियमितपणे प्रक्रिया करण्यात येते. शुक‘वारी सकाळी ९.३० च्या दरम्यान, प्रक्रिया केंद्रालगतच्या शेतात शेतमालकाने शेतातील कचर्‍यास आग लावली. परिसर मोकळा वार्‍याच्या दिशेमुळे ही आग वेगाने पसरत जाऊन सावरगड येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र परिसरात पोहोचली व तेथील कचर्‍याला आग लागली.
 
 
YTL
 
Fire at Yavatmal solid waste center  या घटनेची माहिती मिळताच नगर परिषदच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याची कार्यवाही सुरू केली. आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगर परिषद राळेगाव, घाटंजी व कळंब अग्निशमन यंत्रणांचीही मदत घेण्यात आली. सर्व अग्निशमन दलांनी समन्वयाने व तातडीने कार्य करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. यामध्ये नपच्या ३, तसेच कळंब, राळेगाव व घाटंजी येथील प्रत्येकी १ अग्निशमन गाडी व यवतमाळ नपचे दोन जेटिंग मशिन तसेच जेसीबीच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणण्यास मदत झाली. घटनेत कोणतीही जीवहानी झाली नाही. मात्र, आगीच्या तीव‘तेमुळे सावरगड घनकचरा प्रकि‘या केंद्र परिसरात ठेवण्यात आलेल्या नपच्या ४ फिरत्या शौचालयांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तसेच केंद्रामधील ‘कंपोस्ट स्क्रीनिग मशिन’चे किरकोळ नुकसान झाले आहे.

नागरिकांनी दक्षता बाळगावी
यवतमाळ नगर परिषदकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शेतामध्ये अथवा उघड्या कचरा जाळताना अत्यंत दक्षता बाळगावी. अशा निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता असल्याने सर्वांनी जबाबदारीने वागावे.
शुभम क्यातमवार
मुख्याधिकारी, नप यवतमाळ