नागपूर,
Flag installation ceremony पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने रामनगर येथील राम मंदिरात धर्मध्वज स्थापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.अयोध्या राम जन्मभूमी आंदोलनात संघाचा सक्रिय सहभाग राहिला असून, रामनवमी शोभायात्रेत आंदोलनातील विविध टप्प्यांचे चित्ररथाद्वारे दर्शन घडविण्याची परंपरा कायम आहे. “जन्मभूमीका ताला तोडो”, “मंदिर वही बनायेंगे”, “भव्य राममंदिर” ते “रामदरबार” अशा संकल्पनांचा यापूर्वी समावेश करण्यात आला होता. यावर्षी अध्यक्ष रवी वाघमारे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या धर्मध्वजाचे चित्ररथाद्वारे रामभक्तांना दर्शन घडविण्यात आले.

अक्षय तृतीया व भगवान परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्तावर रविवार, १९ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता या धर्मध्वजाची स्थापना करण्यात येणार आहे.Flag installation ceremony हा धातूचा ध्वज नागपूरचे मूर्तिकार चंद्रकांत (चंदू) कावळे यांनी तयार केला असून, त्यावर कचनार वृक्ष, स्वस्तिक व सूर्य चिन्हांची नक्षी करण्यात आली आहे.कार्यक्रमाची सुरुवात धर्मध्वजाच्या विधिवत पूजनाने होईल. त्यानंतर “श्रीराम जयराम जय जय राम” या मंत्राचा १०८ वेळा जप व रामरक्षा पठण करण्यात येणार आहे. शेवटी प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता होईल.या सोहळ्यास रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष रवी वाघमारे, सचिव राजीव काळेले व विश्वस्त मंडळाने केले आहे.
सौजन्य:रवि वाघमारे,संपर्क मित्र