डिलिव्हरी बाॅयने केली डाॅक्टरला मारहाण

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
एका अ‍ॅपच्या Food delivery boy फ्रूड डिलिव्हरी बाॅयने वरच्या माळ्यावर पार्सल देण्यासाठी नकार देत ग्राहक असलेल्या एका डाॅक्टरला अपार्टमेंटच्या खाली मारहाण केली. धंताेली पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. डाॅ.सचिन (42,अजनी चाैक) असे तक्रारदार डाॅक्टरचे नाव आहे. ते कार्डिओलाॅजिस्ट आहेत. त्यांच्या डाॅक्टर पत्नीने 9 एप्रिल राेजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास अ‍ॅपवरून ऑनलाईन जेवण मागविले. आराेपी रासाेल महेश गडपायले हा अपार्टमेंटच्या खाली पार्सल घेऊन पाेहाेचला व त्याने डाॅ.सचिन यांच्या पत्नीला फोन केला. तुमचे अपार्टमेंट सापडत नाही असे ताे म्हणाला व कुणाला तरी खाली पाठवा असे सांगितले.
 
delivery boy
 
Food delivery boy डाॅ.सचिन हे पार्सल घेण्यासाठी खाली गेले, तेव्हा ताे पाल क्रिएशन नावाच्या इमारतीसमाेर उभा हाेता. त्याने झाेमॅटाेचा गणवेशदेखील घातला नव्हता. डाॅ.सचिन यांनी त्याला डिलिव्हरी बाॅय आहेस का, अशी विचारणा केली. तेव्हा गडपायले संतापला व त्याने ‘तुमचा पत्ता सापडत नव्हता’ असे म्हटले. त्यानंतर तू पार्सल देण्यासाठी वर येण्यास नकार का दिला अशी विचारणा केल्यावर गडपायलेने तुमच्या पत्त्यात पहिला माळा असे लिहीलेले नाही व मी वर येणार नाही असे म्हटले. त्यानंतर त्याने अ‍ॅपवर पार्सल डिलिव्हर्डवर क्लिक केले आणि पार्सल न देताच ताे जाऊ लागला. डाॅ.सचिन यांनी मला पार्सल तर दे असे म्हटले असता त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व त्याने डाॅ.सचिन यांना मारहाण केली. त्याने जवळील एक सिमेंटच्या मलब्यातील दगड उचलला व डाॅ.सचिन यांच्या कान व डाेळ्याच्या खाली वार केला. त्यात डाॅ.सचिन यांच्या डाेळ्याखालून रक्त येऊ लागले. ते पाहून आराेपी तेथून पळून गेला. डाॅ.सचिन यांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी गडपायलेविराेधात गुन्हा दाखल केला आहे.