अपघातग्रस्त दाम्पत्यास मदतीचा हात
यवतमाळ,
नेत्यांचा ताफा रस्त्याने कायम भरधाव जाणार हे गृहित असते. मात्र संवेदना जपत प्रवास राजकीय नेते लाभले तर सर्वसामान्यांच्या सुख, दु:खात रात्री, अपरात्री ते धावून जातात. याचाच प्रत्यय शुक्रवारी रात्री यवतमाळ-अमरावती मार्गावर Guardian Minister Sanjay Rathod पालकमंत्री संजय राठोड यांच्या मदतीमुळे एका अपघातग्रस्त दाम्पत्यास आला. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे शुक्रवारी रात्री नेर येथून आपल्या ताफ्याने यवतमाळकडे येत होते. सोनखास ते दरम्यान एका दुचाकीस्वार दाम्पत्यास अज्ञात वाहनाने धडक दिली होती. हे दाम्पत्य रस्त्याच्या कडेने जखमी अवस्थेत विव्हळत पडून होते.
त्याचवेळी पालकमंत्री राठोड यांचा ताफा तेथून जात होता. अपघाताचे हे दृश्य बघताच त्यांनी आपला ताफा थांबविला. त्यांनी तत्काळ त्यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनातून या दाम्पत्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्याच्या सूचना केल्या. यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देवून डॉक्टरांशीही चर्चा केली. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी जखमींची आस्थेने विचारपूस केली. त्याच दरम्यान रुग्णवाहिका अपघातस्थळी पोचली.
या जखमींना लगेच रुग्णवाहिकेतून यवतमाळकडे रवाना करण्यात आले. मंत्री संजय राठोड यांनी सोबतचे पोलिसांचे सुरक्षा वाहन त्यांच्यासोबत देवून जखमींवर उपचार होईपर्यंत दवाखान्यात थांबण्याच्या सूचना केल्या. पालकमंत्री राठोड यांच्या या संवेदनशील कृतीने दोन जखमी व्यक्तींना वेळीच उपचार मिळून जीवदान मिळाले. यावेळी उपस्थित गावकरी आणि रस्त्याने जाणार्या वाहनधारकांनी Guardian Minister Sanjay Rathod पालकमंत्री संजय राठोड यांच्या कृतीबद्दल कौतुक करीत धन्यवाद मानले.