निवडणुकीच्या रिंगणात उतरली ‘लेडी वीरप्पन’

चंदन तस्कराची पत्नी, मुलगी विधानसभेच्या उमेदवार

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
निवडणुकीच्या रिंगणात उतरली ‘लेडी वीरप्पन’
चंदन तस्कराची पत्नी, मुलगी विधानसभेच्या उमेदवार
चेन्नई
assembly election दोन दशकांपूर्वी चकमकीत मारला गेलेला चंदन तस्कर वीरप्पन पुन्हा एकदा तामिळनाडूत चर्चेत आला आहे. कारण त्याची पत्नी मुथुलक्ष्मी आणि मुलगी विद्याराणी दोघीही यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
 
tamilnadu election 
assembly election तमिलर काची पार्टीकडून वीरप्पनची 35 वर्षीय मुलगी मेट्टूर मतदारसंघातून निवडणू लढवत आहे तर तमिलगा वाझवुरिमाई काची पार्टीकडून मुथुलक्ष्मी कृष्णागिरी मतदारसंघातून मैदानात उतरली आहे. विशेष म्हणजे, वीरप्पनची मुलगी व्यवसायाने वकील आहे.
assembly election या दोघींना उमेदवारी देणारे पक्ष तमिळ राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते आहेत. 2024 मध्ये मुथुलक्ष्मीने लोकसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक मते घेतली होती तर 2006 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
वीरप्पनची प्रतिमा सुधारून जनतेसमोर ती नव्याने मांडण्याचा या दोघींचा प्रयत्न असून तो लोकांना वाटतो तितका दुष्ट गुन्हेगार नव्हता, असे विद्याराणीचे मत आहे.