स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वाशीम,
वाशीम जिल्ह्यात Illegal cattle transportation अवैधरित्या गोवंश वाहतूक करणार्या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करुन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई जिपो अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी अवैधरित्या गोवंशाची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करुन संबंधित वाहन जप्त केले असून, आरोपींना ताब्यात घेतले आहे.
llegal cattle transportation आज, १२ एप्रिल रोजी दोन ट्रकमधुन गोवंशाची वाहतुक होत असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यावरुन सकाळी ५.३० वाजता दरम्यान वाशीम मंगरुळनाथ रोडवर ग्राम कळंबा महाली येथे सापळा रचुन संशयीत वाहन क्रमांक एमएच०४ एफयु ५२४६ व एमएच४४ ४४० यांना अडवुन तपासणी केली असता, सदर वाहनांमध्ये निर्दयीपणे कोंबुन ठेवलेले गोंवश बैल आढळुन आले. प्राण्यांना वाहतुकी दरम्यान कोणत्याही प्रकारची चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच आवश्यक कागदपत्रे नसतांना वाहतुक केली जात असल्याचे निदर्शनास आले. या कारवाई दरम्यान एकुन ३० बैल तसेच २ ट्रक असा एकून अंदाजे ४० लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर इसमांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी सैय्यद अफजल सैय्यद सालार (वय २९) रा. रशीदनगर, दिवाणपुरा, मंगरुळनाथ जि. वाशिम व नाजीमोद्दीन निजामोद्दीन (वय ४२) रा. चहेलपुरा, मंगरुळनाथ असे सांगितले. संबधीत आरोपींविरुध्द विविध कलमांन्वये वाशीम ग्रामीण पोस्टेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिपोअ अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक लता फड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि प्रदिप परदेशी, सपोनि जगदीश बांगर, जिल्हयात अवैध कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशी हालचालींबाबत त्वरीत पोलीसांना माहिती दयावी असे आवाहन पोनि स्थानिक गुन्हे शाखा वाशीम यांनी केले आहे.