कायदेशीर कारवाईची मागणी
ढाणकी,
Illegal sand mining उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर आणि सिंदगी येथील रेतीघाट धारकांकडून होत असलेल्या अवैध रेती उत्खननाची तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी तहसीलदारांकडे केली आहे. नागरिकांच्या तक‘ारीनुसार, सावळेश्वर व सिंदगी येथील रेतीघाटाचा लिलाव झाला असून, अधिकृतपणे काही विशिष्ट शेत सर्व्हे नंबरमधूनच उत्खननाची परवानगी आहे. मात्र, संबंधित नेमून दिलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतरत्रही नदीपात्र आणि परिसरातून बेकायदेशीरपणे रेतीचे उत्खनन करत आहेत.
llegal sand mining या अवैध उत्खननामुळे शासनाची दिशाभूल होत असून नदीपात्रात खोल खड्डे करून निसर्गाचा समतोल बिघडवला जात आहे. तसेच यामुळे पर्यावरण आणि महसुलाची मोठी हानी होत असल्याचे अर्जात नमूद केले आहे. दररोज शेकडो ब‘ास रेतीचे अवैध उत्खनन केले जात अवैधपणे हजारो ब‘ास रेती साठवून ठेवल्या जात आहे. तहसीलदारांकडे अर्जदारांनी मागणी केली आहे की, नदीपात्रातील अवैध उत्खननाचे महसूल विभागामार्फत तातडीने मोजमाप करून त्यांनी ज्या वाळूघाटातून ठरवलेल्या ब‘ासपैकी किती ब‘ास रेती काढली आहे, याची चौकशी करून बेकायदेशीर रेती उत्खनन करणार्या रेतीघाट मालकावर आणि संबंधित यंत्रणेवर कडक कायदेशीर कारवाई करून दंड यावा.
llegal sand mining रेतीची अवैध वाहतूक आणि ओव्हरलोडिंग रोखण्यासाठी घाट परिसरात ट्रिप पावती तपासणीसाठी तत्काळ चौकी कार्यान्वित करून महसूल अधिकारी नियुक्त करण्यात यावा. एकाच रॉयल्टी पासवर वारंवार फेर्या मारून होणारी वाहतूक थांबवण्यासाठी घाटावर सीसीटीव्ही बसवून कारवाई करावी, अशाही मागण्या या नागरिकांच्या आहेत. जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही आणि अवैध थांबत नाही, तोपर्यंत हा घाटांचे काम थांबवण्यात यावे, अशाही मागणीचे निवेदन मुकेश ईरनलवार, योगेश गायकवाड, बालू वाघ, विशाल नरवाडे आणि श्रीनाथ गौरवाड यांनी उपविभागीय अधिकारी मुळे व उमरखेड तहसीलदार राजू सुरडकर यांना दिले आहे. यावर आता उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तक‘ारीची दखल घेऊन संबंधित तलाठी किंवा मंडळाधिकार्यांना प्रत्यक्ष जागेवर पंचनामा करण्याचे आदेश देतील का, यावर आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.