आर्णी,
Mahamanav Jayanti Saptah क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ११ ते १४ एप्रिलदरम्यान देवराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मानवधर्माचा बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी विविध कार्यक‘मांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी या कार्यक‘माचे आयोजन केले आहे.
या दोन्ही महामानवांनी समाजासाठी केलेले कार्य अनमोल आहे. त्यांच्या कार्याची बीजे मानवधर्माचा उद्धार करण्यासाठी व्हावा, यासाठी Mahamanav Jayanti Saptah महामानव जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ११ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता सामाजिक वितरण सोहळा पार पडला. त्यानंतर माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांचे ‘महात्मा ज्योतिबा फुले यांची सामाजिक व शैक्षणिक क‘ांती काल, आज व उद्याची स्थिती’ या विषयावर व्या‘यान झाले. सोमवार, १३ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता सत्कार समारंभ, बक्षीस वितरण व चंद्रकांत झटाले यांचे ‘स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव’ या विषयावर व्या‘यान होणार मंगळवार, १४ एप्रिलला संध्याकाळी मोटारसायकल अभिवादन रॅली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन रॅली निघणार आहे.