उष्णतेचा कहर विदर्भात उष्णलाटेचा इशारा

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
मुंबई
weather update राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता नागरिकांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. महाराष्ट्रभर उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून कोकण आणि विदर्भ भागात उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
 

Maharashtra weather update, heatwave alert Vidarbha, 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी (१२ एप्रिल) राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते. विशेषतः विदर्भातील काही भागांत उष्णलाटेची शक्यता वर्तवण्यात आली असून यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
दुपारच्या वेळेत तापमान झपाट्याने वाढण्याची शक्यता असून उष्माघाताचा धोका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी भरदुपारी घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोकण विभागात उष्ण weather update  आणि दमट हवामान कायम राहणार असून समुद्रकिनारी भागात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने उकाडा अधिक जाणवेल. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असली तरी पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. या भागात किमान तापमान २४ ते २६ अंश तर कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.उत्तर महाराष्ट्रातही कोरडे आणि उष्ण वातावरण कायम राहील. येथे दिवसभर तापमान उच्च पातळीवर राहण्याची शक्यता असून नागरिकांना उष्णतेचा तीव्र त्रास जाणवू शकतो. या भागात किमान तापमान २३ ते २५ अंश तर कमाल तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.एकूणच, पावसाचा धोका सध्या टळला असला तरी वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.