नागपूर,
Mahatma Phule Bazar तापमानाचा पारा चढताच नागपूरकरांनी कुलरकडे धाव घेतली असून कॉटन मार्केटमधील महात्मा फुले बाजार सध्या अक्षरशः फुलला आहे. देशातील मोठ्या कुलर उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये आता उन्हाचा तडाखा वाढताच या बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडताना दिसत आहे.
रविवारीही सकाळपासूनच बाजारपेठ गजबजलेली असते. जसजसा सूर्य डोक्यावर येतो, तसतशी ग्राहकांची गर्दी वाढत जाते. विक्रेत्यांच्या मते, यंदा उकाडा लवकर वाढल्याने कुलरची मागणीही अपेक्षेपेक्षा अधिक वाढली आहे.Mahatma Phule Bazar एकीकडे तापमानाने हैराण झालेले नागरिक, तर दुसरीकडे तेजीत आलेला कुलर बाजार!असे चित्र सध्या नागपूरच्या महात्मा फुले बाजारात पाहायला मिळत आहे.
सौजन्य : सारंग टोपरे,संपर्क मित्र