सरस्वती विद्यालयात महात्मा फुले जयंती

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Saraswati Vidyalaya सरस्वती विद्यालयात महात्मा ज्योतिराव फुले यांची २०० वी जयंती मोठ्या आदराने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी श्रीनिवासन, उपमुख्याध्यापिका शैली अय्यर तसेच पर्यवेक्षक रविंद्र कुलकर्णी आणि राहुल घोडे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रभावी सादरीकरण करत वातावरणात चैतन्य निर्माण केले. सावित्रीबाई फुले यांच्या वेशात शरयू आंदे हिने प्रेरणादायी भाषण सादर केले, तर महात्मा फुले यांची भूमिका साकारणाऱ्या समर्थ झाडे याने समानता आणि चिकाटीचा प्रभावी संदेश दिला.
 
 
Saraswati Vidyalaya
 
दक्षिण भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष टी. के. व्यंकटेश, सचिव व्ही. मीनाक्षी तसेच इतर सदस्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मार्गदर्शन केले. Saraswati Vidyalaya अनुजा कोलते यांच्या नेतृत्वाखाली सभेत शिक्षण, वाचन आणि समाजसुधारणेला पाठिंबा देण्याची शपथ घेण्यात आली. उपमुख्याध्यापिका शैली अय्यर यांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाद्वारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना अर्थपूर्ण अभिवादन करण्यात आले.
 
सौजन्य: अनघा पेंडके, संपर्क मित्र