आ. कुणावार यांनी लक्ष घालण्याची गरज
सिंदी (रेल्वे),
राष्ट्रीय महामार्ग ३५३ (आय) वरील Marda Bridge मारडा गावालगतचा पूल बाधून झाला. परंतु, त्याच्या दोन्ही बाजुंना मुरुम टाकून भराईचे काम रखडले आहे. याकडे आमदार समीर कुणावार यांनी तातडीने लक्ष देण्याची विनंती भाजपा कार्यकर्ते दत्ता कोपयकर आणि मित्रांनी केली आहे.
Marda Bridge सेलडोह ते कांढळीपर्यंत जाणार्या महामार्ग ३५३ चे काम जोमाने सुरू आहे. या मार्गावर खडकाळा तसेच मारडा नाल्यांवर पुलाचे काम सुरू होते. त्यापैकी मारडा येथील पूल बांधून तयार आहे. परंतु, अप्रोच रोडसाठी भूमी अधिग्रहण झाले नसल्याचे बोलल्या जाते. यंदाच्या पावसाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी त्या पुलाच्या दोन्ही बाजुला मुरुम भरुन पूल वाहतुकीसाठी खुला करणे गरजेचे आहे, असे आमदार कुणावार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. खडकाळा नाल्यावरील काम युद्धस्तरावर सुरू असून एक किंवा दीड महिन्यात त्या पुलाचे व उर्वरित रोडचे बांधकाम पूर्ण होऊ शकेल. मात्र, मारडा नाल्यावरील पूल सज्ज असूनही त्यावरून वाहतूक सुरू होण्याची शयता दिसत नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष पुरवावे तसेच आ. कुणावार यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यत केली जात आहे.