यवतमाळ,
‘Margin Money’ Loan Scheme सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ८ ते १४ एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह करण्यात आला आहे. १० एप्रिल २०२६ रोजी बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धामणगाव रोड, यवतमाळ येथे ‘मार्जिन मनी’ कर्ज योजनेबाबत विशेष मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक ज्योत्स्ना तिजारे यांनी केले व कार्यक‘माचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त, समाज कल्याण मून होत्या. त्यांनी ‘मार्जिन मनी’ योजनेची माहिती देताना सांगितले की, केंद्र शासनाच्या ‘स्टॅण्ड अप इंडिया’ योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांना भांडवलाअभावी अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर एकूण प्रकल्प किमतीच्या लाभार्थी हिस्स्यामधील २५ टक्क्यांपैकी जास्तीत जास्त १५ टक्के मार्जिन मनी (फ‘ंट एंड सबसिडी) शासनामार्फत उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे सुलभ कर्ज मिळून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी सांगितले.
‘Margin Money’ Loan Scheme जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सिडाम यांनी योजनेची माहितीसाठी प्रस्ताव तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. मु‘य व्यवस्थापक, आयडीबीआय बँक, मु‘य शाखा निखिल बोरकर यांनी कर्ज मंजुरीसाठी आवश्यक परवाने व कागदपत्रांची माहिती देऊन योग्य प्रस्ताव सादर केल्यास पूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य विजय नागोरे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त झाल्यानंतर उद्योग स्थापन करताना भेडसावणार्या आर्थिक अडचणींचा उ‘ेख करून, अशा कार्यशाळांमुळे आत्मनिर्भरतेचा मार्ग सुकर होईल, असे सांगितले. संचालन रुपेश वानखेडे यांनी, तर आभारप्रदर्शन मेश्राम यांनी केले. कार्यशाळेची सांगता संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने आली. कार्यक‘मासाठी प्रकल्प अधिकारी राहुल कराळे यांनी परिश्रम घेतले.