श्रीराम मंदिरात हनुमान चालीसा पठण
समुद्रपूर,
भारतीय संस्कृतीने अनेक संकटांचा सामना केला आहे. आक्रमण, सामाजिक बदल आणि विविध आव्हानांच्या काळातही आपल्या पूर्वजांनी धर्म आणि परंपरा जपण्याचे कार्य अविरत सुरू ठेवले. आजच्या पिढीनेही या संस्कृतीचे जतन करून पुढील पिढ्यांपर्यंत ती पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. संस्कृती टिकली तरच राष्ट्र सशत होते, असे प्रतिपादन नागपूर येथील प्रख्यात धर्मप्रवचक Mohan Bakre Guruji मोहन बाकरे गुरुजी यांनी केले.
गिरड येथे सकल हिंदू समाज तथा श्रीराम मंदिर देवस्थानच्या वतीने आयोजित सामूहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात ते बोलत होते. सनातन संस्कृतीचे जतन, समाजातील बंधुभाव दृढ करणे आणि धार्मिक नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, गावकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. बाकरे गुरुजी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य स्थापनेतील व धर्मरक्षणातील योगदान अधोरेखित करताना अहल्याबाई होळकर यांनी मंदिरांचे पुनरुज्जीवन करून संस्कृतीला दिलेले बळही स्पष्ट केले. विविध जाती, पंथ आणि समाजघटकांनी एकत्र येऊन संस्कृतीचे रक्षण केले तरच समाज सशत आणि एकसंघ राहू शकतो, असेही ते म्हणाले.
Mohan Bakre Guruji कार्यक्रमाला गावातील हनुमान चालीसा पठण मंडळी, महिला-पुरुष, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामूहिक पठणामुळे परिसरात भतिमय व सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी समाजातील ऐय, बंधुभाव आणि राष्ट्रहिताची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यत केला. भविष्यातही अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.