नागपूरचा पारा ४१.४ अंश सेल्सिअस

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
दिवसभर कडक आणि उकाड्याने हैराण
सर्वाधिक तापमान अकोल्याचे ४३.१ अंश सेल्सिअस
 
नागपूर,
Nagpur Temperature अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागपूरचा पारा कमी झाला होता. मात्र आता शहराचे कमाल तापमान ४१.४ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. रविवारी, संपूर्ण देशात अकोला शहराचे सर्वाधिक तापमान ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
 
 
temp
 
Nagpur Temperature  दुपारच्या सुमारास कडक ऊनामुळे कूलरची वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ३ ते ४ दिवसांत नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात सुमारे ५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानातही सुमारे ३ अंशांनी वाढ होण्याचे संकेत आहेत. शनिवारी शहराचे कमाल तापमान ३९.४ अंश नोंदविण्यात आले होते.