दारव्हा,
'Nanhe Sitare' competition नन्हे सितारे जिल्हास्तर स्पर्धा ७ एप्रिल रोजी यवतमाळात पार पडली. जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनात, विनोबा सहायक शिक्षक कार्यक‘म, ओपन लिंक फाउंडेशन यांच्यावतीने पार पडली.
या स्पर्धेत दारव्हा तालुक्यातील चिखली रामनाथच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कृष्णाई विलास देशकरी हिने कथा सादरीकरण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात क‘मांक पटकावला. तिच्या या यशामुळे शाळेचे तसेच दारव्हा तालुक्याचे नाव जिल्ह्यात उज्ज्वल झाले आहे.
'Nanhe Sitare' competition या यशाबद्दल मंदार पत्की यांच्या हस्ते कृष्णाई देशकरी हिला प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह तसेच विनोबा शैक्षणिक साहित्याची बॅग देऊन सन्मानित करण्यात आले आले. यावेळी गटशिक्षणाधिकारी क्रांती खेडकर, विस्तारअधिकारी विलास भड, शेख, केंद्रप्रमुख आरू, राजू मंडवाल, विजय मेश्राम, बावणे हजर होते. कृष्णाईच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक वंदना टारपे, शिक्षक शोभा पिंगे यांच्याकडून कौतुक करण्यात आले. ती आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शन करणार्या शिक्षक नीलकमल राऊत यांना देते. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.