रेल्वेत चोरी करणार्‍या टोळीतील चार आरोपींना अटक

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
रेल्वे सुरक्षा कारवाई
 
नागपूर, 
प्रवाशांच्या सामानाची चोरी होण्याच्या घटनांना प्रभावीपणे आळा घालण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाचे रेल्वे सुरक्षा दलाने ‘Operation Passenger Security’ ‘ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी’ अंतर्गत विशेष मोहीम राबविली. या मोहिमेचा एक भाग म्हणून, रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर आणि शासकीय रेल्वे पोलीस (जीआरपी) इतवारी यांच्या संयुक्त कारवाईत एका आंतरराज्यीय टोळीतील आरोपींना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्च, २०२६ रोजी, ५५१८९ इतवारी-छिंदवाडा पॅसेंजरमधील एका प्रवाशाच्या बॅगेतून सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जीआरपी इतवारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
rel
 
ट्रेन क्रमांक ५८२०६ इतवारी-रायपूर पॅसेंजरमधील एका प्रवाशाकडून २,२०,८५३ रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी जीआरपी इतवारी येथे गुन्हा दाखल करण्यात या घटनांची गंभीर दखल घेऊन आरपीएफने एक विशेष पथक आणि बनावट पथके तयार करीत आरोपींचा शोध घेतला. पथकाच्या संयुक्त कारवाईत, ट्रेन क्रमांक ५८२०६ मधून तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली.
 
 
‘Operation Passenger Security’  सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितांच्या ओळखीवरून त्यांचा सहभाग निश्चित झाला. ही टोळी प्रामुख्याने प्रवासी गाड्यांमधील वरच्या बर्थवर ठेवलेल्या बॅग आणि लक्ष्य करीत असल्याचे तपासात उघड झाले. आरोपीने बॅगेखाली वर्तमानपत्रे पसरवून किंवा बॅगेची साखळी उघडून आणि नंतर ती पुन्हा बंद करून मौल्यवान वस्तू चोरत होते. प्रवाशांना चोरी झाल्याचे लगेच लक्षात येत नाही. या टोळीचा म्होरक्या, जो बिहारच्या खगरिया भागाचा असून छत्तीसगडमधील भिलाई येथून ही टोळी चालवतो आणि बेरोजगार तरुणांना या ओढतो.