पाटणा-पुणे ट्रेनमध्ये आढळली 167 मुले

मानव तस्करीचा संशय, बिहारमधून महाराष्ट्रात आणण्याचा डाव उधळला

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
जबलपूर,
Patna Pune एका सामाजिक संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, आरपीएफ, जीआरपी आणि महिला व बाल विकास विभागाच्या संयुक्त पथकाने पाटणा-पुणे ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या 167 मुलांना ताब्यात घेतले. मानव तस्करीच्या संशयातून कटनी रेल्वे स्थानकावर ही कारवाई करण्यात आली. सध्या या मुलांना बालगृहात पाठवण्यात आले आहे.
 

Patna Pune  
मध्य प्रदेशातील कटनी रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री उशिरा पाटणा-पुणे ट्रेनमधून प्रवास करणाèया बिहार येथील 167 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. ही मुले 7 ते 15 वयोगटातील आहे. एका सामाजिक संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मानव तस्करीच्या संशयातून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आरपीएफच्या एका अधिकाèयाने दिली. मुलांना संशयास्पद परिस्थितीत बिहामधून महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनर येथे नेण्यात येत होते. ट्रेन कटनीला पोहोचताच कारवाई करण्यात आली. बाल संरक्षण अधिकाèयांनी मुलांचे समुपदेश सुरू केले आहे. बहुतांश मुले मुस्लिम समाजातील असून त्यांना मदरशांमध्ये प्रवेशासाठी नेले जात असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली.
कुटुंबीयांशी साधला संपर्क
80 मुलांना सध्या Patna Pune  जबलपूर येथील बालगृहात पाठवण्यात आले आहे, तर उर्वरित मुलांना कटनी येथील बाल संरक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. बाल कल्याण समिती, रेल्वे पोलिस आणि महिला व बाल विकास विभाग यांचे संयुक्त पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. मुलांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला जात आहे. तपास पूर्ण झाल्यावरच प्रकरण मानवी तस्करीचे आहे की मुलांना कायदेशीर शैक्षणिक उद्देशांसाठी नेले जात होते हे समोर येईल अशी माहिती आरपीएफ अधिकाèयाने दिली.