वणीतील ज्योती बार परिसरात मटका जुगारावर पोलिसांची कारवाई

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
वणी, 
येथील ज्योती बार परिसरात सुरू असलेल्या वरळी Police action against Matka gambling मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई करत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवार, ११ एप्रिलला संध्याकाळी करण्यात आली. ज्योती बारच्या बोळीत एका इसमाकडून लोकांकडून पैसे घेऊन वरळी मटक्याचे आकडे लिहिले जात माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपींकडून नगदी ९६० रुपये जप्त करण्यात आले.
 
 
Jugar
 
Police action against Matka gambling  या प्रकरणात शेख इरफान शेख रज्जाक (वय ४२) व शेख फारूख शेख सलीम (वय ३६) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या, कार्बनचा तुकडा व बॉलपेन असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शुभम महानवर यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.