वणी प्रीमियम लीग मनसे चषक २०२६ जल्लोषात शुभारंभ

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
वणी, 
Premium League MNS Cup 2026 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या संकल्पनेतून आणि मनसेच्या वतीने आयोजित ‘दिवस व रात्रकालीन वणी प्रीमियम लीग मनसे चषक २०२६’ (सीजन-३) या भव्य क्रिकेट स्पर्धेचा आज वणी शासकीय मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात आणि आकर्षक आतषबाजीत शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना त्यांच्या क्रीडागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे विजय मुकेवार होते.
 
 
chashak
 
मनसेकडून कार्यासोबतच युवकांच्या क्रीडागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी संघांसाठी लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून, त्यामुळे खेळाडूंमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. उद्घाटनप्रसंगी आमदार संजय देरकर यांनी मनसे आणि राजू उंबरकर यांच्या उपक‘माचे कौतुक ग‘ामीण भागातील युवकांना अशा प्रकारच्या क्रीडा व्यासपीठांची नितांत गरज असल्याचे सांगितले. त्यांनी राजू उंबरकर यांचे अभिनंदन करून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
 
 
Premium League MNS Cup 2026  या कार्यक्रमाला मनसे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इरशाद खान, मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेश पेचे, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर, गोविंद थेरे, व्यापारी सेनेचे शहराध्यक्ष राकेश वैद्य, दिलीप मस्के, बोदाडकर, राजू बोदाडकर, अविनाश पाटील, रवी आंबटकर, महेश हातगावकर, संजय गौरकर, मयूर घाटोळे तसेच आयोजक समितीचे शैलेश ढोके, नदीम शेख आणि वणी शहरातील क्रीडाप्रेमी मोठ्या सं‘येने उपस्थित होते.